रस्त्यावर अडथळा करणाऱ्या हातगाडीधारकांवर गुन्हे दाखल…

करमाळा/ संदेश प्रतिनिधी:
शहरातील विविध भागांमध्ये रस्त्यावर हातगाड्या लावून नागरिकांना अडथळा निर्माण करणाऱ्या विरोधात करमाळा पोलिसांनी कारवाई केली आहे.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल मयूर नागेश कदम यांनी फिर्याद दिली आहे. त्यांनी फिर्यादीत नमूद केले आहे की, दिनांक 25 जुलै रोजी पोथर नाका परिसरात तौफिक मजीद पठाण याने रस्त्यावर अशा प्रकारे हातगाडी लावली होती की, त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीस अडथळा होवून लोकांच्या जिवीतास धोका पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली होती.त्याचप्रमाणे सोहेल जनमहमद शेख, अभिषेक शरद गायकवाड तसेच सुभाष चौकात जाकीर नजीर बागवान, प्रशांत पंडित अडसूळ, समीर शब्बीर बागवान यांनीही अशाच प्रकारे रस्त्यावर हातगाड्या उभ्या करून अडथळा निर्माण केला होता.
या सर्वांविरोधात करमाळा पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून, पुढील तपास पोलीस हवालदार सचिन हिंगमिरे करत आहेत. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी अडथळा निर्माण करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले आहे.



