करमाळा बायपासवर गोवंश जनावरांची निर्दयी वाहतूक उघड; आयशर टेम्पोसह जप्ती -

करमाळा बायपासवर गोवंश जनावरांची निर्दयी वाहतूक उघड; आयशर टेम्पोसह जप्ती

0
संग्रहित छायाचित्र

करमाळा ता.५: शहरातील बायपासवर पोलिसांनी मध्यरात्री कारवाई करत गोवंश जनावरांची अमानुष व बेकायदेशीर वाहतूक उघडकीस आणली. या कारवाईत आयशर टेम्पोसह जनावरे जप्त करण्यात आली असून दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दि. ३ एप्रिल २०२६ रोजी रात्री उशिरा डायल 112 वरून मिळालेल्या माहितीनुसार, काही व्यक्ती आयशर वाहनातून बैल व गायी कतलीसाठी नेत असल्याची माहिती करमाळा पोलिसांना मिळाली. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण पथकातील कर्मचारी वैभव ठेंगल व त्यांच्या पथकाने तत्काळ कारवाई करत करमाळा बायपासवरील जामखेड चौक येथे सापळा रचला. पहाटे सुमारे १.३० वाजण्याच्या सुमारास जामखेडकडून येणारा एक संशयित आयशर टेम्पो अडविण्यात आला. पंचांसमक्ष तपासणी केली असता वाहनात गोवंश जातीची जनावरे अमानुष पद्धतीने कोंबून नेली जात असल्याचे आढळून आले.

या कारवाईत एकूण १० गोवंश जनावरे (बैल व गायी) तसेच सुमारे २९ लाख ९६ हजार रुपये किमतीचा आयशर टेम्पो जप्त करण्यात आला. वाहनातील जनावरांच्या तोंडाला चिकटपट्टी बांधून त्यांना चारापाणी व वैद्यकीय सोयीशिवाय निर्दयतेने वाहतूक केली जात असल्याचे उघड झाले.

पोलिसांनी चालक नावद वाहिद कुरेशी (रा. गोवंडी, मुंबई सध्या जामखेड) व त्याचा सहकारी रिहान अय्याज कुरेशी (रा. जामखेड) यांना ताब्यात घेतले आहे. जप्त करण्यात आलेल्या जनावरांना पुढील काळजीसाठी गोशाळेत पाठविण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!