केम येथील जनार्दन तर्कसे यांचे निधन

केम (संजय जाधव): केम (ता.करमाळा) येथील ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक धर्मपंडित जनार्दन विठ्ठल तर्कसे यांचे मिरज येथे वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ९६ वर्षे होते.
योगायोग म्हणजे आजच त्यांचा वाढदिवस सकाळी मिरज येथील विद्यामंदिर येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी संस्थेचे अध्यक्ष, शिक्षकवृंद, राजकीय, धार्मिक क्षेत्रातील मान्यवर तसेच ज्येष्ठ नागरिक आणि मिरज येथील त्यांच्यावर प्रेम करणारे नागरिक उपस्थित होते. परंतु नियतीच्या मनात काय होते याची कल्पना कुणालाच नसते. सकाळी वाढदिवस साजरा झाला आणि दुपारी २.३० वाजता त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. केम येथील श्रीराम तर्कसे गुरूजी ते यांचे वडील होते.
त्यांच्या निधनाने केम व मिरज परिसरात हळहळ व्यक्त होत असून त्यांच्या अनेक भागांत शिष्य आहेत.
