पोथरे येथील ममताबाई शिंदे यांचे निधन

करमाळा/संदेश प्रतिनिधी
करमाळा, ता.22: पोथरे (ता. करमाळा) येथील सौ. ममताबाई तुळशीराम शिंदे (वय 70) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आज दुपारी साडेतीनच्या सुमारास दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने ग्रामस्थांवर शोककळा पसरली आहे.
ममताबाई शिंदे या धर्मिक व सांप्रदायिक कार्यात सदैव सक्रिय होत्या. घराच्या प्रगतीत त्यांनी मेहनत, कष्ट आणि समर्पणाने मोलाचे योगदान दिले.
त्यांच्या पश्चात पती,दीर, दोन मुले, एक मुलगी, पुतणे, पुतणी,सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्या पोथरे येथील बागायतदार व ज्येष्ठ नेते सोपानकाका शिंदे यांच्या भावजय होत, तसेच ॲड.नानासाहेब शिंदे तसेच पंचायत समितीच्या माजी सभापती भाग्यश्री ताई शिंदे–खटके यांच्या चुलती होत्या तसेच हनुमान भजनी मंडळ व शनैश्वर दिडीं सोहळा संस्थेचे मार्गदर्शक गंगाधर शिंदे यांच्या त्या मातोश्री होत्या. भजनाच्या गजरात रात्री आठच्या सुमारास त्यांच्यावर शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले.
ग्रामस्थ व विविध सामाजिक मंडळांनी त्यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
