प्रांताधिकाऱ्याच्या रिक्त जागेमुळे नागरिकांची कामे खोळंबली - तातडीने नियुक्तीची पालकमंत्र्यांकडे मागणी -

प्रांताधिकाऱ्याच्या रिक्त जागेमुळे नागरिकांची कामे खोळंबली – तातडीने नियुक्तीची पालकमंत्र्यांकडे मागणी

0

करमाळा (दि. १६) – करमाळा व कुर्डूवाडी विभागात गेल्या अनेक दिवसांपासून प्रांताधिकारी नियुक्त नसल्याने नागरिकांना विविध शासकीय कामकाजासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेऊन तातडीने प्रांताधिकारी नियुक्त करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात चिवटे यांनी स्पष्ट केले आहे की, प्रांताधिकाऱ्याच्या अनुपस्थितीमुळे शालेय विद्यार्थ्यांना आवश्यक शासकीय दाखले मिळण्यात अडचण येत आहे, तर शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना विविध शासकीय सेवा घेण्यासाठी वेळ व त्रास सहन करावा लागत आहे.

या मागणीची तत्काळ दखल घेत, पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी लवकरच माढा उपविभागीय अधिकारी नियुक्त केला जाईल, अशी माहितीही त्यांनी दिल्याचे चिवटे यांनी सांगितले.

या विषयाला वाचा फोडल्याबद्दल आणि लोकांच्या प्रश्नांना आवाज दिल्याबद्दल चिवटे यांच्या या पावलाचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!