कुंभारगावातील वीज सबस्टेशनची जागा बदलण्याची मागणी

करमाळा : करमाळा तालुक्यातील कुंभारगाव गायरान गट नं. ११० वर महावितरण कंपनीचे सबस्टेशन उभारण्याच्या निर्णयाविरोधात ग्रामस्थांनी तीव्र आक्षेप घेतला असून, हा प्रकल्प गट नं. ५१ मध्ये हलवावा, अशी मागणी करत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुभाष ओहोळ यांनी तहसीलदारांना निवेदन सादर केले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गावातील गायरान गट नं. ११० वर मागासवर्गीय कुटुंबे १९९८ पासून शेती करून उदरनिर्वाह करीत आहेत. एकूण १६ कुटुंबांकडे शेतीव्यतिरिक्त अन्य कोणतेही रोजगाराचे साधन नाही. जर या जमिनीत सबस्टेशन उभारले गेले, तर या कुटुंबांवर उपासमारीची वेळ येईल, कुंभारगाव गायरान हद्दीतील गट नं. ५१ मध्ये कोणीही शेती करत नसल्याने तेथे सबस्टेशन उभारता येऊ शकते. त्यामुळे गट नं. ११० ऐवजी गट नं. ५१ मध्ये प्रकल्प हलविण्यात यावा.


हे निवेदन तहसीलदार, पोलीस निरीक्षक, उपअभियंता महावितरण कार्यालय करमाळा, यांना देण्यात आले आहे.



