देवळालीत बिबट्या दिसल्याचा दावा - शेळीवर हल्ला केल्याची माहिती - शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन.. -

देवळालीत बिबट्या दिसल्याचा दावा – शेळीवर हल्ला केल्याची माहिती – शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन..

0

करमाळा / संदेश प्रतिनिधी : 

करमाळा : देवळाली (ता.करमाळा) येथे मंगळवार (ता.७) रात्री ८ वाजण्याच्या सुमारास गणेशकर व शेख वस्ती परिसरात बिबट्यासदृश्य प्राणी दिसला असल्याचा दावा केला असून त्याने एका शेळीवर हल्ला केला आहे असेही सांगितले आहे, त्यामुळे गावात व परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची माहिती समजताच करमाळा पंचायत समितीचे माजी सभापती गहिनीनाथ ननवरे व देवळालीचे सरपंच आशिष गायकवाड यांनी गावातील नागरिकांनी काळजी घ्यावे, असे आवाहन सोशल मीडियाच्या माध्यमातून केले आहे.

तसेच देवळालीचे सरपंच आशिष गायकवाड यांनी तातडीने यासंदर्भात आमदार संजयमामा शिंदे यांना माहिती दिली व त्यानंतर आ.शिंदे यांनी तात्काळ वनखात्याच्या अधिकाऱ्यास व पोलीस खात्यास फोन करून तात्काळ चौकशी करण्याच्या सूचना दिल्या व देवळाली व परिसरातील सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. अशी माहिती सरपंच आशिष गायकवाड यांनी दिली. त्यानुसार या भागाची उद्या (बुधवारी) सकाळी पहाणी केली जाणार असल्याचे वन निरीक्षक एस.आर.कुरुले यांचेकडून सांगण्यात आले आहे. नागरिकांनी काळजी घेण्याचेही त्यांनी आवाहन केले आहे. मात्र बिबट्या म्हटले की, नागरिकांमध्ये चांगलेच भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. कारण करमाळा तालुक्यातील जनतेला मागील बिबट्याच्या घटना माहिती आहेत. 

Deolali claimed to appear in the bicycle – the goat has been attacked – appeal to the farmers stay alert ..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!