उपजिल्हाधिकारी उर्मिला पाटील यांच्याकडून आवाटी येथील पूरग्रस्तांना मदत

करमाळा (दि.३): सीना नदीला आलेल्या पुरपरिस्थितीत आपले सर्वस्व गमावलेल्या आवाटी येथील पूरग्रस्तांना सालसे (ता.करमाळा) गावच्या कन्या व सध्या ठाणे जिल्ह्यात प्रांताधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या उर्मिला पाटील यांच्याकडून मदतीचा हात देण्यात आला. या मदतीअंतर्गत पूरग्रस्त कुटुंबांना ब्लँकेट्स, जीवनावश्यक वस्तू व किराणा साहित्य आदी वस्तू असलेल्या ८० किटचे वाटप करण्यात आले. या मदतीमुळे पूरग्रस्तांमध्ये दिलासा व समाधानाचे वातावरण निर्माण झाले.

या प्रसंगी प्राध्यापक अर्जुन सरक, दादासाहेब बंडगर, गणेश पाटील, संतोष सोनवर, राजू खान , राहुल खताळ, राजू खताळ, भैरू बंडगर, जालिंदर हराळे ,शिवाजी सुळ, यशवंत सूळ, अरबाज खान, धनाजी माने , बिभीषण पाटील, संदीप वायकुळे, किरण मोरे,आदी मान्यवर उपस्थित होते.
पूरग्रस्तांना वेळोवेळी अशा प्रकारची मदत मिळाल्यास त्यांच्या जगण्याला उभारी मिळेल, असे मत नागरिकांनी व्यक्त केले.




