देशमुख यांनी लोकविकासच्या धर्तीवर दुसरा मोठा प्रकल्प उभारावा – डॉ. हिरडे यांचे आवाहन

करमाळा, ता. 26 : लोकविकास डेअरीच्या धर्तीवर दीपक आबा देशमुख यांनी तालुका पातळीवर दुसरा मोठा व्यवसायिक प्रकल्प उभारावा, असे आवाहन करमाळ्याचे डॉ. ॲड. बाबूराव हिरडे यांनी केले. लोकविकास डेअरीचे संस्थापक दिपक आबा देशमुख यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

या कार्यक्रमाला केडी एक्सपोर्टचे मालक किरण डोके, व्यापारी भूषण सेठ लुंकड, प्रा. डॉ. संजय चौधरी, प्रा. शिवाजीराव बंडगर, राजेंद्र रणसिंग, उद्योजक दत्ता पवार, वैभव पोळ, तात्या कळसाईत, भागवतराव पाटील, डॉ. शिंदे, भारत अण्णा साळुंखे, साळुंखे बंधू, शेतीतज्ज्ञ सोमनाथ हुलगे, विलास अप्पा लबडे, शिवाजी सरडे, अमर ठोंबरे, महेंद्र पाटील, राहुल लोंढे, लतीफ तांबोळे, परेश दोशी, अंगद पाटील, विजय लबडे, नानासाहेब साळुंखे, विष्णू पोळ, गंगाधर पोळ, सचिन बोराडे, राजू घोडके आदी विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. हिरडे पुढे म्हणाले की, “देशमुख यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून गेल्या 32 वर्षांपासून दुधाचा प्रकल्प यशस्वीरित्या चालवून स्वतःचा ‘लोकविकास’ हा स्वतंत्र ब्रँड निर्माण केला आहे. आता त्यांनी तालुक्यातील इतर उद्योजकांना एकत्र आणून एक मोठा विकासात्मक प्रकल्प उभारावा. या प्रकल्पातून शेतकऱ्यांना बाजारपेठ मिळेल, बेरोजगारांना रोजगार मिळेल आणि तालुक्याच्या उत्पादन क्षमतेत वाढ होईल.”

किरण डोके यांनी देशमुख यांचे कार्य इतरांना अनुकरणीय असून, ते कोणत्याही व्यवसायात यशस्वी होऊ शकतात, असे सांगितले. प्रा. डॉ. संजय चौधरी म्हणाले, कोणतीही लाज न बाळगता व्यवसायाशी एकनिष्ठ बांधील असणारे त्यांचे व्यक्तिमत्त्व आहे. श्री. लुंकड यांनी ते गुणवत्तेवर तडजोड न करणारे व्यवसायिक असल्याचे नमूद केले. तर श्री. रणसिंग यांनी दिलेला शब्द पाळणारे व सचोटीने काम करणारे व्यवसायिक असल्याचे सांगितले.

“आजचा हा सत्कार माझा नसून माझ्या सर्व सहकाऱ्यांचा आहे. तालुका पातळीवर प्रकल्प उभारण्याच्या संदर्भात मांडलेल्या सूचनेबाबत मी सकारात्मक विचार करेन. घाईगडबड न करता योग्य ती तयारी, सर्वांचा सल्ला व मते जाणून घेतल्यानंतरच कोणता व्यवसाय इथे यशस्वी होऊ शकतो, याचा ठाम निर्णय घेऊन उद्योग सुरू करण्याचा मी नक्की प्रयत्न करेन.”
— दिपक देशमुख, वांगी
यावेळी प्रा. शिवाजीराव बंडगर, प्रा. डॉ. संजय चौधरी, डॉ. शिंदे, भागवत पाटील, राजेंद्र रणसिंग तसेच उद्योजक दत्ता पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार गजेंद्र पोळ यांनी केले तर सूत्रसंचालन प्रशांत नाईकनवरे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पवार ट्रॅक्टर्सच्या सर्व कर्मचाऱ्यांनी विशेष मदत केली.
