नवरात्रोत्सव निमित्ताने झोळ फाउंडेशनने घडवून आणले महिलांचे देवदर्शन - Saptahik Sandesh

नवरात्रोत्सव निमित्ताने झोळ फाउंडेशनने घडवून आणले महिलांचे देवदर्शन

केम (संजय जाधव) –  नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसांच्या काळात  प्रा.रामदास झोळ फाउंडेशनच्या माध्यमातून करमाळा तालुक्यातील प्रत्येक गावांमधून तीन ते चार बसेसच्या माध्यमातून महिलांना देवदर्शन घडवून आणण्यात आले. यामध्ये पिंपळे-कुरकुंभ-सिद्धटेक-राशीन-करमाळा अशा मार्गाने हे देवदर्शन आयोजित केले होते.

देवदर्शनासाठी जात असताना विसाव्याच्या ठिकाणी म्हणजेच दत्तकला शिक्षण संस्था भिगवन या ठिकाणी महिलांना उपवासाच्या नाश्त्याची सोय करण्यात आली होती. तसेच हळदी कुंकू लावून साडी चोळी देऊन दत्तकला शिक्षण संस्थेच्या सौ. माया ताई झोळ यांच्याकडून महिलांचा सन्मान करण्यात आला. दत्तकला शिक्षण संस्थेच्या सचिव मायाताई झोळ यांच्या नियोजनातून हे देवदर्शन घडविण्यात आले.

याविषयी अधिक माहिती देताना मायाताई झोळ म्हणाल्या की, नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने करमाळा तालुक्यातील नारी शक्तीचा जागर करण्याच्या निमित्ताने, महिलांच्या कला गुणांना वावं देण्यासाठी हा कार्यक्रम हाती घेण्यात आला. नवरात्र काळात तालुक्यातून रोज किमान दोन ते अडीच हजार महिलांनी या दर्शन सेवेचा लाभ घेतला.  करमाळा मतदार संघातील किमान पंधरा हजार बायकांना या माध्यमातून देव दर्शनाचा लाभ देता आला. करमाळा मतदारसंघातील महिलांनी या उपक्रमाला उस्फुर्तपणे प्रतिसाद दिला आहे.

प्रा. रामदास झोळ यांनी यंदाची करमाळा-माढा विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढविण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. साखरकारखान्यांकडून थकलेली ऊस बिले मिळविण्यासाठी केलेली आंदोलने, दुष्काळात मतदारसंघात टँकरने केलेला पाणीपुरवठा, विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करणे, आराधी गायन स्पर्धा, देवदर्शनाच्या माध्यमातून महिलांना एकत्र आणणे, मराठा आंदोलनाला उपस्थित राहण्यासाठी ५०० गाड्यांना इंधन देणे अशा विविध उपक्रमातून ते मतदार संघामध्ये पोहोचत आहेत.  त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी जोरदार तयारी केल्याचे दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!