गुडीपाडव्यानिमित्त श्री कमलाभवानी मंदिरात भाविकांची गर्दी..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : येथील श्री कमलाभवानी मंदिरात आज (ता.९) गुडीपाडवानिमित्ताने भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती, विशेषतः महिलांची दर्शनासाठी मोठी रांग लागलेली होती.
दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी गुडीपाडवानिमीत्ताने करमाळा शहरातील व तालुक्यातील भाविकांनी श्री कमलाभवानी मंदिरात गर्दी केली, यामध्ये महिला व लहान मुलांची गर्दी होती. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु असल्यामुळे दिवसभर घराबाहेर पडता येत नाही, त्यामुळे सायंकाळी मंदिरात दर्शनासाठी भाविक येत होते. मंदिरात लहान मुलांसाठी खेळणी दुकाने तसेच खाद्यपदार्थ विक्रीसाठी असल्याने लहान मुलांनी आनंद व्यक्त केला. रात्री उशीरापर्यंत शहरातील भाविक येत होते.