उत्तरेश्वर अन्नछत्र वर्धापन दिन उत्साहात; धार्मिक कार्यक्रमांना भाविकांची गर्दी

केम (संजय जाधव): येथील जागृत ग्रामदैवत श्री उत्तरेश्वर देवस्थान अन्नछत्राचा तेरावा वर्धापन दिन सोमवार, ३० मार्च रोजी उत्साहात संपन्न झाला. या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ७ ते ८ या वेळेत रुद्राभिषेकाने झाली. त्यानंतर सकाळी ८ ते १० दरम्यान सामुदायिक सत्यनारायण महापूजा पार पडली. पुढे सकाळी १० ते १२ या वेळेत ह. भ. पं. विनोद महाराज रोकडे (झी टॉकीज फेम) यांचे हरिकीर्तन झाले. त्यानंतर अन्नपूर्णा देवीची आरती घेण्यात आली. दुपारी १ ते २ या वेळेत महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास मठाधीश जयंतगिरी महाराज तसेच देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष व सर्व सदस्य उपस्थित होते. यावेळी अन्नछत्रासाठी देणगी दिलेल्या भाविकांचा देवस्थान ट्रस्टच्या वतीने सत्कार करण्यात आला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री उत्तरेश्वर भक्त व देवस्थान ट्रस्टच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. वर्धापन दिनानिमित्त मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
यावर्षी महाप्रसादाचे वाटप दुपारी १ ते २ या वेळेत करण्यात आले. मात्र त्यानंतर आलेल्या काही भाविकांना प्रसाद मिळू न शकल्याने त्यांच्या नाराजीचा सूर उमटला.


