करमाळा येथील बुद्ध विहारात आश्विन पौर्णिमा उत्साहात साजरी

करमाळा(समाधान दणाने) : करमाळा शहरातील सिद्धार्थ नगर येथील त्यागमूर्ती माता रमाई बुद्ध विहार येथे आश्विन पौर्णिमा व वर्षावास समाप्ती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष बौद्धाचार्य प्रशांत कांबळे यांनी “बौद्ध धम्म व मानवता” या विषयावर प्रेरणादायी धम्म प्रवचन दिले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भीम कन्या लेझीम संघाचे अध्यक्ष रमेश भरत कांबळे हे होते. या औचित्याने समता सैनिक दलामार्फत फरसाण व जिलबीचे वाटप करण्यात आले. तसेच दिलीप चाचा कांबळे व भीमराव (फकीरा) कांबळे यांच्या परिवाराकडून खीरदान करण्यात आले, तर अमोल भोसले व शांता महादेव कांबळे यांच्यातर्फे केळीचे वाटप करण्यात आले.


या वेळी समता सैनिक दलाचे तालुकाध्यक्ष महाराजा कांबळे, किरण मोरे, गणेश कांबळे, शेखर जगदाळे, गणेश उबाळे, शंकर शिंदे, अजय कांबळे, फकीरा कांबळे, जयवंत दिलीप कांबळे, संतोष कांबळे आदी बौद्ध बांधव, उपासक-उपासिका तसेच केंद्रातील शिक्षिका उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष हरी कांबळे यांनी केले.




