करमाळा शहरात ८ ते १० फेब्रुवारी दरम्यान धर्मवीर आनंद दिघे करमाळा फेस्टिवलचे आयोजन

करमाळा (संदेश प्रतिनिधी) : करमाळा शहरात आठ ते दहा फेब्रुवारी दरम्यान आनंद दिघे करमाळा फेस्टिवलचे आयोजन करण्यात आल्याची माहिती बाळासाहेबांची शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व फेस्टिव्हल चे आयोजक महेश चिवटे यांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे व रुद्रांशू श्रीकांत शिंदे यांच्या संयुक्त वाढदिवसानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे त्यांनी सांगितले.
आठ ते दहा फेब्रुवारी च्या दरम्यान सलग तीन दिवस नऊ ते चार वेळेच्या दरम्यान भव्य मोफत आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी शिबिर होणार आहे. हे शिबिर करमाळा शहरातील देवीच्या माळ रोडवरील पेट्रोल पंपा समोर (शाहूनगर) होणार आहे.
बुधवारी आठ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा ते दहा या वेळेत राज्यस्तरीय ग्रुप डान्स स्पर्धा आयोजित केलेली आहे. तसेच याच दिवशी करमाळा शहर व तालुक्यातील 6 ते 14 वयोगटातील स्पर्धकांची डान्स स्पर्धा घेतली जाणार आहे. या स्पर्धेचे उद्घाटन युवानेते पृथ्वीराज शिवाजीराव सावंत व टायगर ग्रुप चे अध्यक्ष तानाजी जाधव यांच्या हस्ते होणार आहे.
9 फेब्रुवारीला सायंकाळी सहा ते दहा या वेळेत त्याच ठिकाणी राज्यस्तरीय सोलो डान्स स्पर्धा होणार आहेत.
या स्पर्धेचे उद्घाटन वाकाव ग्रामपंचायतीचे सरपंच ऋतुराज शिवाजीराव सावंत यांच्या हस्ते होणार आहे.
10 फेब्रुवारीला सायंकाळी सहा ते दहा या वेळेत न्यू होम मिनिस्टर या स्पर्धेचे आयोजन केले आहे या स्पर्धेला बाळासाहेबांची शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तानाजीराव सावंत व मीनाक्षीताई तानाजीराव सावंत तसेच मायाताई रामदास झोळ हे उपस्थित राहणार आहेत. जास्तीत नागरिकांनी आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा व या स्पर्धांना उपस्थित राहुन स्पर्धकांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन आयोजक महेश चिवटे यांनी केले.
