अपघातात दिगंबर पालवे यांचा मृत्यू

करमाळा, ता. 26 : मलवडी गावचे रहिवासी दिगांबर मुरलीधर पालवे (वय 79) यांचा मोटारसायकल अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यात दामोदर दिगांबर पालवे यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की 22 सप्टेंबर ला सकाळी सकाळी साडेदहाच्या सुमारास त्यांचे वडील दिगांबर पालवे हे रिटेवाडी येथे जाण्यासाठी लुना एमएच 45 एच 3546 या दुचाकीवरून निघाले होते. जेऊर बायपास चौकात आयशर टेम्पो चालकांने त्यांच्या लुनाला धडक दिल्यांने ते गंभीर जखमी झाले.उपचार सुरू असतानाच करमाळा उपजिल्हा रुग्णालयात त्यांचे निधन झाले. टेम्पों चालकाविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेने मलवडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.





