आदिनाथसाठी इच्छुक कार्यकर्त्यांना  दिग्विजय बागल यांचे आवाहन - Saptahik Sandesh

आदिनाथसाठी इच्छुक कार्यकर्त्यांना  दिग्विजय बागल यांचे आवाहन

करमाळा(दि.१०)- श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूकीसाठी इच्छुक कार्यकर्त्यांनी आपल्या बागल गटाच्या संपर्क कार्यालयातून येऊन निवडणूक फॉर्म भरून सादर करावेत असे आवाहन मकाई कारखान्याचे माजी चेअरमन व शिवसेना युवा नेते दिग्विजय बागल यांनी केले आहे.

याबाबत अधिक बोलताना श्री बागल म्हणाले की श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक लागली असून श्री. आदिनाथ कारखाना गेल्या वीस वर्षापासून बागल गटाच्या ताब्यात आहे. लोकनेते स्वर्गीय दिगंबररावजी बागल यांनी आदिनाथ कारखान्याला कर्जमुक्त केले होते. माजी आमदार शामलताई बागल व रश्मीदिदी बागल यांच्या नेतृत्वाखाली व विलासरावजी घुमरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आदिनाथ कारखाना सहकार क्षेत्रात अग्रेसर राहावा यासाठी आदिनाथच्या सर्व संचालक मंडळाने अथक प्रयत्न केले आहेत. परंतु गेल्या सात ते आठ वर्षांपासून सहकारी साखर कारखाने चालवणे टिकवणे व त्यामध्ये कारखान्यामधील वाढती स्पर्धा व आर्थिक पाठबळ नसल्याने कारखाने चालवणे अवघड होत चालले आहे. परंतु आदिनाथच्या सभासदांचा बागल या नावावर प्रचंड विश्वास आहे. त्यामुळे याचा सभासद निश्चित विचार करतील याचा मला विश्वास आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज भरावे अर्ज छाननी प्रक्रियेनंतर याबाबत आमच्या नेत्या भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्षा व साखर संघ संचालिका माननीय रश्मीदिदी बागल व मार्गदर्शक आदरणीय विलासरावजी घुमरे सर हे अंतिम विचार विनिमयाच्या बैठकीनंतर राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब व उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्याशी सविस्तर चर्चा करून त्यांचा सल्ला घेऊन कार्यकर्त्यांना पुढील सूचना देतील अशी ही माहिती शेवटी श्री. दिग्विजय बागल यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!