'बिबट्या'चा तातडीने बंदोबस्त करावा - दिग्विजय बागल यांची प्रशासनाकडे मागणी... -

‘बिबट्या’चा तातडीने बंदोबस्त करावा – दिग्विजय बागल यांची प्रशासनाकडे मागणी…

0


करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : मांगी (ता.करमाळा) येथे बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार झाले असून, या भागातील शेतकरी व नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे, मोहोळ आणि सोलापूर येथील वन अधिकारी यांनी नागेश बागल यांच्या वासरावर हल्ला केला त्या घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली यावेळी दिग्विजय बागल यांनी वनपरिक्षेत्रपाल श्री लटके आणि त्यांच्या सहकारी अधिका-यांशी चर्चा करून पिंज-यांची संख्या वाढवावी,तसेच ड्रोण द्वारे बिबट्याचा शोध घेऊन ग्रामस्थांना तात्काळ दिलासा द्यावा अशी मागणी केली.

मागील वर्षी अंजनडोह येथील नरभक्षक बिबट्याच्या हल्याच्या कटू आठवणी ताज्या असल्याने प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी अशी मागणी मकाई कारखान्याचे माजी चेअरमन दिग्विजय बागल यांनी केली आहे. सदर घटनेची तातडीने गंभीर दखल घेऊन सोलापूर वन विभाग अधिका-यांशी भ्रमणध्वनीद्वारे चर्चा केली. तसेच राज्याचे वन व सांस्कृतिक मंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांना इ मेल द्वारे संपर्क साधून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची विनंती केली आहे.

यावेळी मांगी ग्रामस्थांसोबत अमित बागल, किशोर बागल अभिजीत बागल, स्वतः नागेश बागल डॉक्टर धनराज देवकर, तात्या बागल पोलीस पाटील आकाश शिंदे तसेच तालुका पंचायत समितीचे पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

संबंधित बातमीची लिंक – बिबट्याचा वासरावर हल्ला – मांगी-पोथरे-कामोणे गावांमध्ये भितीचे वातावरण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!