नवभारत स्कूलमध्ये टाळ मृदुंगाच्या गजरात दिंडी सोहळा संपन्न…
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : श्री गिरधरदासजी देवी प्रतिष्ठान संचलित नवभारत इंग्लिश मेडियम स्कूल व ट्विंकलिंग स्टारमध्ये दिंडी सोहळा संपन्न झाला. मुलांना आपल्या परंपरेचे ओळख करून देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थी वारकरी पोशाखामध्ये उपस्थित होते. ढोल टाळ तसेच विद्यार्थ्यांनी केलेल्या विठुरायाच्या नामघोषाने पूर्ण वातावरण दुमदुमून गेले होते. छोटी छोटी मुले तर विठ्ठल रुक्मिणीच्या वेशा मध्ये खूपच छान सजून आली होती. या कार्यक्रमाचे अध्यक्ष कन्हैयालाल जी देवी व सौ सुनीता ताई देवी, श्री प्रज्योत दोशी व सौ आरती दोशी , शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता मोहिते यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले.
ढोल ताशा व टाळ यांच्या गजरात दिंडीला सुरुवात झाली. चौका चौकामध्ये मुलांनी व मुलींनी दिंडीतील कार्यक्रम सादर केले. याप्रसंगी सुनीलबापू सावंत, अशोक शाह, ज्योत्स्ना शाह , रंजना देवी,घनश्याम दास गांधी, संतोष कटारिया, मनुलाल गांधी ,प्रतीक दोशी ,अशोक दोशी, चांदगुडे भाऊसाहेब, राजेंद्र वाशिंबेकर, जगदीश अग्रवाल अभिजीत वाशिंबेकर, मयूर देवी ,शाळेचे संचालक सौ सुनीताताई देवी, चंद्रकांतजी देवी, विजय दोशी, अमोल संचेती तसेच मोठ्या संख्येने पालक वर्ग ही उपस्थित होते.
या दिंडीची दत्त मंदिर येथे सांगता करण्यात आली. विशेष म्हणजे शाळेच्या सर्वेसर्वा असो सुनीताताई देवी यांनी दिंडीच्या सुरुवातीपासून दिंडीची सांगता होईपर्यंत पायी चालून दिंडीचा आनंद घेतला. विद्यार्थ्यांना प्रज्योत दोशी, व महावीर यांच्यातर्फे खाऊ वाटप करण्यात आला. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी सर्व शिक्षकांनी कष्ट घेतले.