केम येथील आश्रमशाळेत दिंडीचे जोरदार स्वागत -

केम येथील आश्रमशाळेत दिंडीचे जोरदार स्वागत

0

केम (संजय जाधव):श्री क्षेत्र कुकाणा तरवडी ते पंढरपूर दरम्यान निघालेल्या पायी दिंडी सोहळ्याचे केम येथील आश्रमशाळेत जोरदार स्वागत करण्यात आले. सायंकाळी पाच वाजता दिंडीचे आश्रमशाळेत आगमन झाले. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या मुख्याध्यापक श्री. जगताप सर यांनी पालखीचे औपचारिक स्वागत केले, तर हे.भ.प. वाघमोडे सर यांनी विणेकरी महाराज यांची पाद्यपूजा करत भक्तिभाव व्यक्त केला.

या दिंडीत सुमारे २५० वारकरी सहभागी होते. सायंकाळी सात वाजता दिंडीच्या वतीने भोजन व्यवस्था करण्यात आली होती. भोजनानंतर आठ वाजता भारूड, भजन व समाजप्रबोधनपर कार्यक्रम रंगला. संपूर्ण आश्रमशाळा भक्तीमय वातावरणाने दुमदुमून गेली होती. विद्यार्थ्यांनीही या अनुभवाचा मनमुराद आनंद घेतला.

सकाळी दिंडीच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी नाष्ट्याचीही व्यवस्था करण्यात आली. वारकऱ्यांनी विद्यार्थ्यांना मदत केली आणि शाळेच्या व्यवस्थेचे मनःपूर्वक कौतुक केले. दुपारी एक वाजता दिंडीने पुढील मुक्कामासाठी प्रस्थान ठेवले.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!