दिव्यांग ज्ञानेश्वर पवार यांना शिवसेनेतर्फे फिरती खुर्ची भेट

करमाळा (दि.८) – वीट येथील दिव्यांग ज्ञानेश्वर पवार यांना शिवसेनेच्या वतीने फिरती चार चाकी सायकल भेट देण्यात आली. या सायकलीचे वितरण शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या हस्ते करण्यात आले.

ज्ञानेश्वर पवार यांचे दोन्ही पाय अपंग असल्यामुळे त्यांना हातावर आधार घेत चालावे लागत होते. त्यांच्या या परिस्थितीची दखल घेत शिवसेनेच्या वतीने ही मदत करण्यात आली.
शिवसेनेच्या वतीने करमाळा तालुक्यात आतापर्यंत ३० दिव्यांग बांधवांना फिरत्या खुर्च्या तसेच अनेकांना कृत्रिम हात-पाय देण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, तसेच करुणानिधी ट्रस्ट, मुंबईचे उदयसिंह राणा यांच्या माध्यमातून ही मदत देण्यात आल्याची माहिती चिवटे यांनी या वेळी दिली.


शिवसेनेच्या माध्यमातून मला ही पंधरा हजार रुपये किमतीची खुर्ची मिळाली आहे. आता मला जमिनीवर खरडून चालावे लागणार नाही. सर्वांचे मी मनःपूर्वक आभार मानतो असे दिव्यांग ज्ञानेश्वर पवार यांनी सांगितले.




