निंभोरे येथे महिला स्वयंसहाय्यता समूहांना बँक कर्ज वितरण

केम (प्रतिनिधी/संजय जाधव) – निंभोरे (ता.करमाळा) येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत ३० नोव्हेंबर रोजी बँक ऑफ इंडिया शाखा साडे मार्फत महिला स्वयंसहाय्यता समूहांना बँक कर्ज वितरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमा पूजनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यमान सरपंच रवींद्र वळेकर, प्रमुख पाहुणे म्हणून बँक ऑफ इंडिया साडेचे शाखा व्यवस्थापक श्री.जाधव हे होते तर मार्गदर्शक म्हणून तालुका अभियान व्यवस्थापक योगेश जगताप हे उपस्थित होते.

यावेळी श्री.जगताप यांनी उपस्थित महिलांना, बँक कर्ज परतफेड, व्याज अनुदान योजना, विमा योजना, व्यवसाय निर्मिती, विविध प्रकारचे निधी, योजना याबाबत सखोल मार्गदर्शन केले.
शाखा व्यवस्थापक श्री.जाधव यांनी महिलांनी व्यवस्थित कर्ज परतफेड करावी ल, तसेच कर्जाचा वापर योग्य कारणासाठी करावा याबाबत मार्गदर्शन केले. शाखे मार्फत चार समूहांना 32.56 लाख रू.चे मान्यवरांचे हस्ते वाटप करण्यात आले. एप्रिल 2023 पासून निंभोरे गावात 92 लाख रू. कर्ज वाटप करण्यात आले आहे.

कौशल्य समन्वयक प्रशांत मस्तुद यांनी DDUGKY मार्फत दिले जाणारे विविध प्रकारचे प्रशिक्षण बाबत माहिती दिली.
यावेळी उपसरपंच अनिता पाटील, प्रभाग समन्वयक आकाश पवार आदीजन उपस्थित होते. कार्यक्रमचे सूत्रसंचालन दिलीप मूळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राणी लक्ष्मी व जिजाऊ महिला ग्राम संघाचे पदाधिकारी,लिपिका मंजुश्री मूळे, सुषमा वाघमारे, बँक सखी अनिता चव्हाण, योगिता जानभरे व व्यवस्थापक श्री.पवार यांनी सहकार्य केले.


