वडशिवणे येथे वडिलांच्या पुण्यस्मरणानिमित्त सुपारीच्या २५० रोपांचे वाटप
करमाळा (संदेश प्रतिनिधी) – वडशिवणे (ता.करमाळा) येथे वडिलांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांच्या मुलांनी ग्रामस्थांना सुमारे 250 सुपारीच्या रोपांचे वाटप करून झाडे लावा आणि झाडे जगवा हा संदेश दिला.
वडशिवणे येथे कै. ह.भ.प. पुंडलिक नामदेव जगदाळे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त ह.भ. प. श्री बापूसाहेब ढगे महाराज (राष्ट्रीय उपाध्यक्ष विश्व वारकरी संघ मु. सुरवड तालुका इंदापूर जिल्हा पुणे) यांच्या कीर्तन सेवेचा कार्यक्रम आयोजित केला होता. किर्तनानंतर सदर रोपांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमास भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष शंभूराजे जगताप, पुणे चिंचवड येथील रोटरी क्लब ऑफ वाल्हेकर वाडीचे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष प्रदीप वाल्हेकर, सुभाष वाल्हेकर, सुधीर मरळ, सचिन खोले, जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळ शिराळ अंबाड चे संस्थापक अध्यक्ष नंदकुमार टोणपे, रोहन टोणपे, श्री जाधव सर आदी मान्यवर उपस्थित होते. याचबरोबर वडशिवणे ग्रामस्थ या कार्यक्रमास उपस्थित होते.
महादेव जगदाळे, विठ्ठल जगदाळे, गोविंद जगदाळे, बहिणाबाई बबन वारे यांच्यासह जगदाळे परिवाराने हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केला.