किंग्स फाउंडेशनकडून ११,१११ मोदकांचे वाटप

करमाळा : गणेशोत्सवानिमित्त किंग्स फाउंडेशनतर्फे ११,१११ मोदकांचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात शुक्रवारी (दि. ५ सप्टेंबर) सायंकाळी पार पडला.

किंग्स फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शंभूराजे जगताप यांच्या हस्ते मोदकांचे वितरण करण्यात आले. दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या फाउंडेशनने यापूर्वी कोरोनाकाळात नागरिकांना मास्कचे वाटप, तसेच तालुकास्तरीय नृत्यस्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.



मोदक वाटप कार्यक्रमाला तहसीलदार शिल्पा ठोकडे, शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे, ॲड. नवनाथ राखुंडे, एपीआय गिरिजा मस्के यांच्यासह किंग्स फाउंडेशनचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.


