करमाळा तालुका पत्रकार संघाच्या आदर्श पत्रकार पुरस्कारांचे वितरण संपन्न - Saptahik Sandesh

करमाळा तालुका पत्रकार संघाच्या आदर्श पत्रकार पुरस्कारांचे वितरण संपन्न

१.शितलकुमार मोटे (टीव्ही ९), २.सिद्धार्थ वाघमारे (संघर्ष न्यूज), ३. सचिन जव्हेरी (जनमत), ४. शेखर स्वामी (दिव्य मराठी), ५. प्रवीणकुमार अवचर (कृषी सहकार) ६.विशाल परदेशी (तेजवार्ता),

करमाळा (संदेश प्रतिनिधी) करमाळा तालुका पत्रकार संघाच्या वतीने देण्यात येणाऱ्या आदर्श पत्रकार पुरस्कारांचे वितरण  काल (ता.21) करमाळा येथे करण्यात आले.

करमाळा येथील हॉटेल राजयोगच्या सभागृहात पार पडलेल्या या पुरस्कार वितरण कार्यक्रमात जेष्ठ पत्रकार संजय आवटे, राजा माने, जयंत जाधव, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे, ॲड. डॉ. बाबुराव हिरडे, पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश चिवटे, शिवसेना नेत्या ज्योतीताई वाघमारे, ज्येष्ठ नेते विलासराव घुमरे, पत्रकार संघाचे सचिव नासीर कबीर आदी मान्यवरांच्या हस्ते सदर पुरस्कार वितरण करण्यात आले. याप्रसंगी जेष्ठ पत्रकार नरसिंह चिवटे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

सदर वेळी शेखर स्वामी (दिव्य मराठी), सिद्धार्थ वाघमारे (संघर्ष न्यूज), विशाल परदेशी (तेजवार्ता), शितलकुमार मोटे (टीव्ही नाईन), सचिन जव्हेरी (जनमत), प्रवीणकुमार अवचर (कृषी सहकार) यांना अनुक्रमे पाच हजार एक रुपये, तीन हजार एक रुपये, दोन हजार पाचशे एक रुपये, दोन हजार एक रुपये, एक हजार पाचशे एक रुपये अशा पारितोषिक रकमेसह सन्मानपत्र, पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.

यावेळी राजेंद्र बारकुंड, संतोष वारे, प्रताप जगताप, प्रा. गोवर्धन चवरे – पाटील, हनुमंत मांढरे -पाटील, ॲड. शिरीष लोणकर, डॉ. कोमल शिर्के, मनोहर शिंदे, पत्रकार विनायक दिक्षित, धनंजय मोरे, राजेंद्र चिवटे, शिवसेना महिला आघाडीच्या प्रियंका गायकवाड आदिंसह करमाळा, कुर्डूवाडी, माढा, मोडनिंब, सांगोला आदि भागातून उपस्थित असलेले पत्रकार उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार आशपाक सय्यद यांनी तर सुत्रसंचलन किशोरकुमार शिंदे यांनी केले. आभार पत्रकार प्रा. अशोक नरसाळे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!