वाढदिवसाचा वायफळ खर्च टाळत मतिमंद शाळेतील विद्यार्थ्यांना ब्लँकेट आणि खाऊचे वाटप

केम(संजय जाधव): मूळचे केम येथील व पुण्यामध्ये फर्निचर व्यावसायिक म्हणून कार्यरत असलेले राजाभाऊ देवकर यांनी वाढदिवसाचा वायफळ खर्च टाळत सामाजिक बांधिलकी जपली. केम येथील नागनाथ मतिमंद निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना ब्लँकेट आणि खाऊचे वाटप करून त्यांनी वाढदिवस साजरा केला.

देवकर यांचा फुरसुंगी (पुणे) येथे आरडी एंटरप्राईजेस इंटरनेट डिझाईन मॉड्यूलर फर्निचर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी या नावाने व्यवसाय सुरु आहे.

सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोलापूर जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी मनोज राऊत होते. मनोज राऊत म्हणाले की, “राजाभाऊ देवकर यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने अनाठायी खर्च टाळून अंध व अपंग विद्यार्थ्यांमध्ये आनंद निर्माण केला. विद्यार्थ्यांचा उत्साह पाहून आनंद वाटतो. समाजात अशा उपक्रमांनी सकारात्मकता वाढते, तसेच इतरांनीही याचा आदर्श घ्यावा.” शाळेच्या कार्याचेही त्यांनी कौतुक केले.

कार्यक्रमास महेश तळेकर (संस्थापक अध्यक्ष), संदीप तळेकर (प्रहार संघटना करमाळा तालुका अध्यक्ष), सागर राचे दौंड (कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक), सागर राजे तळेकर (शिवसेना जिल्हा समन्वयक), बापूराव तळेकर, सचिन तळेकर, योगेश ओहोळ, संजय राऊत, धनंजय ताकमोगे, सुलतान मुलानी, संजय अवघडे, आप्पा पळसकर, रवींद्र मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविंद्र पाटील यांनी केले, तर आभार शाळेचे मुख्याध्यापक नाळे यांनी मानले.


