वाढदिवसानिमित्त जि. प. मलवडी शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप

केम (संजय जाधव) : प्रहार संघटनेचे संघटक व मलवडी येथील रहिवाशी नामदेव पालवे यांनी आपला वाढदिवस मलवडी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यासोबत शैक्षणिक साहित्य वाटप करून साजरा केला.

यावेळी प्रहार संघटनेचे युवा जिल्हा कार्याध्यक्ष गणेश कोंडलकर तालुका संपर्कप्रमुख सागर पवार सरपंच कल्याण सातव व शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष राजेंद्र पालवे,रमेश कोंडलकर सचिन व्होरे, शरद पालवे,भरत सुरवसे,आबा कोंडलकर, जानु मंगवडे, प्रविण मत्रे उपस्थित होते.

या प्रसंगी सागर पवार म्हणाले प्रहार संघटनेचे संघटक नामदेव पालवे यांनी वाढदिवसाचा वायफळ खर्च टाळून त्यानी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले. या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी असेच वाढदिवस साजरे करून समाजापुढे आदर्श निर्माण करावा. या वेळी जि.प. शाळेतील मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांनी नामदेव पालवे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!