संगमेश्वर विद्यालय व पतंजली योग समितीकडून पूरग्रस्त विद्यार्थ्यांना धान्यकिट व शैक्षणिक साहित्याचे वाटप

करमाळा(दि. ३) : करमाळा तालुक्यातील श्री संगमेश्वर विद्यालय, संगोबा व पतंजली योग समिती, इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमाने पूरग्रस्त विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना मदतीचा हात देण्यात आला.

दि. २ ऑक्टोबर रोजी दसऱ्याच्या मुहूर्तावर विद्यालयाच्या वतीने बोरगाव येथील शिंदेवस्ती व खांबेवाडी येथील कोळेकर वस्तीवर जाऊन धान्यकिट, साडी, ब्लँकेट, पॅट तसेच शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
या उपक्रमावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनिल शिंदे, शिक्षक भागडे सर, चव्हाण सर, इंदापूर येथील पतंजली समितीचे सदस्य, पूरग्रस्त विद्यार्थी-पालक, खांबेवाडीचे पोलीस पाटील, निलजचे पोलीस पाटील तसेच देवस्थानचे पुजारी उपस्थित होते.

पूरग्रस्तांनी पुराच्या वेळी अनुभवलेले प्रसंग कथन करताच उपस्थितांचे मन हेलावून गेले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनिल शिंदे यांनी पतंजली योग समितीच्या टीमचे मनःपूर्वक आभार मानले.




