करमाळ्यात ३०० कामगारांना गृह उपयोगी भांडी संच वाटप – बांधकाम कामगार मेळावा संपन्न..

0

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : श्रीराम प्रतिष्ठान व भाजपा कामगार आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बांधकाम कामगार मेळाव्यात ३०० कामगारांना गृह उपयोगी भांडी संच वाटप करण्यात आले. याप्रसंगी आई फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मोहन डांगरे हे उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना आई फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मोहन डांगरे म्हणाले कि, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनीच खऱ्या अर्थाने बांधकामागाराचे जीवनमान उंचावले आहे, देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व कारभार करायला लागल्यापासून सर्वसामान्य जनतेचा विचार शासन दरबारी व्हायला लागला व बांधकाम कामगार सारख्या कष्टकरी वर्गाला न्याय मिळायला लागला.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून करमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा.विनोदजी घुगे साहेब होते .यावेळी घुगे यांनी बांधकाम कामगार या दुर्लक्षित घटकाकडे श्रीराम प्रतिष्ठानच्या माध्यमातून गणेश चिवटे यांनी राबवलेला हा उपक्रम स्तुत्य आहे. कामगारांनी या सर्व योजनाचा लाभ आवश्य घ्यावा सोबतच आपले आरोग्य जपावे व व्यसनापासून दूर राहावे असे आवाहन उपस्थित बांधकाम कामगारांना केले.

या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये भाजपचे जिल्हा सरचिटणीस तथा श्रीराम प्रतिष्ठान चे अध्यक्ष गणेश चिवटे म्हणाले की, भाजपा सरकार सत्तेत आल्यापासून बांधकाम कामगारांना अनेक नवीन योजना लागू करण्यात आल्या.सन २०१७ ला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी बांधकाम कामगारांचे जीवनमान उंचावण्यासाठी या योजनेत आमूलाग्र बदल करुन व्याप्ती वाढवली व या योजनेचा जास्तीत जास्त कष्टकरी घटकांना लाभ देण्यासाठी योजना बनवली त्यामुळे गर्भातील बालकापासून ते कामगारांच्या मृत्यूपर्यंत चे सर्व लाभ देणारी जगातील एकमेव योजना म्हणून त्यांनी बांधकाम कामगार योजना बनवली आहे, त्यामुळे आता बांधकाम कामगारांना शिक्षण, आरोग्य,विवाह ते शेवटपर्यंतच्या सर्व लाभाची योजना बनवल्या.

यावेळी भाजपाचे तालुका सरचिटणीस नितीन झिंजाडे यांनी आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाचे आभार भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अमोल पवार यांनी केले ते यावेळी त्यांनी करमाळा तालुक्यातील गणेश चिवटे यांच्या नेतृत्वाखाली श्रीराम प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेली १५ वर्षांपासूनचे सामाजिक कार्य सांगत आपण शालेय विद्यार्थ्यांना रोज रात्री मोफत भात भाजी, गरजू निराधार वृद्ध लोकांना मोफत दोन वेळचे जेवण. याचबरोबर दरवर्षी सामुदायिक विवाह सोहळा साजरा करण्यात येतो असे सांगितले.

यावेळी बांधकाम नोंदणी करण्यासाठी सहकार्य करणारे इंजिनियर प्रवीण गायकवाड,रोहित कोरपे,निलेश माने,लक्ष्मण कांबळे यांचा सन्मान व्यासपीठावरील मान्यवारांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी व्यासपीठावर जिल्हा उपाध्यक्ष अफसर जाधव,तालुकाध्यक्ष रामभाऊ ढाणे,शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल,तालुका सरचिटणीस काकासाहेब सरडे,डॉ. अभिजीत मुरूमकर,बंडू शिंदे,आजिनाथ सुरवसे ,विनोद महानगर, उमेश मगर , सोमनाथ घाडगे,धर्मराज नाळे, दीपक गायकवाड, गणेश परदेशी ,सोमनाथ घाडगे ,किरण शिंदे, संदिपान कानगुडे , जेष्ठ नागरिक सेलचे तालुकाध्यक्ष विष्णू रंदवे, हरिभाऊ झिंजाडे , भैया गोसावी, लक्ष्मण शेंडगे, दादासाहेब देवकर मच्छिंद्र हाके ,नितीन निकम, सुनील जाधव ,प्रकाश ननवरे, कामगार आघाडीचे तालुकाध्यक्ष गणेश माने, दिपक गायकवाड, सतीश कोल्हे ,सुनील नेटके, सुनील आल्हाट ,पप्पू मंडलिक,दादासाहेब कडू,दिलीप चव्हाण, जयसिंग भोगे,मोहन नेटके, किरण शिंदे,संदीप काळे,बापू मोहोळकर,हर्षल शिंगाडे,आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!