केम येथील नागनाथ मतिमंद शाळेच्या विद्यार्थ्यांना मुंबईमधील संस्थेकडून साहित्य वाटप

केम (प्रतिनिधी/ संजय जाधव) – केम येथील नागनाथ मतिमंद निवासी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांगजण सशक्तिकरण संस्थान क्षेत्रीय केंद्र नवी मुंबई यांच्या कडून शैक्षणिक साहित्याचे किट वाटप करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून करमाळा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सुग्रीव निळ हे होते. ज्योती खरात या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नागनाथ पाथरूट, करमाळा मूकबधिर शाळेचे मुख्याध्यापक श्री काळे व श्री.खरसडे, पालक प्रतिनिधी नवनाथ मुटेकर प्रमुख आदी जणांची प्रमुख उपस्थित होती. ज्योतीताई खरात यांच्या मार्गदर्शनातून हे किट उपलब्ध झाले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांनी दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन केले. त्यानंतर त्याच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे किट वाटप करण्यात आले. यावेळी शाळेविषयी माहिती श्रीमती जाधव व श्री. नलवडे यांनी दिली. करमाळा शाळेचे मुख्याध्यापक श्री काळे व प्रमुख पाहुणे ज्योती खरात तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष मा श्री निळ यांनी विदयार्थी व पालकांना मार्गदर्शन केले. या वेळी सर्व पालक सर्व कर्मचारी सर्व विदयार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविंद्र पाटील यांनी केले तर मुख्याध्यापक हिरालाल नाळे यांनी आभार मानले.


