करमाळ्यात राज्यस्तरीय कॅरम स्पर्धा; नागराज मंजुळे यांच्या हस्ते बक्षीस वितरण

करमाळा (दि.२२) – करमाळा कॅरम असोसिएशनच्या वतीने प्रसिद्ध सिने दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या वाढदिवसानिमित्त करमाळा येथे राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा सोमवार व मंगळवार, दि. २५ व २६ ऑगस्ट रोजी 12 वाजता होणार असून स्पर्धेचे ठिकाण जयवंतराव नामदेवरावजी जगताप बहुउद्देशीय सभागृह, महादेव मंदिर समोर, किल्ला वेस करमाळा जिल्हा सोलापूर हे आहे.

या स्पर्धेत प्रथम बक्षीस ११,००० रुपये, द्वितीय बक्षीस ७,००० रुपये, तृतीय बक्षीस ५,००० रुपये, चतुर्थ ३,००० रुपये, पाचवे २,००० रुपये तर सहावे, सातवे व आठवे प्रत्येकी १,००० रुपये असे ठेवण्यात आले आहेत. स्पर्धेसाठी प्रवेश फी ५०० रुपये असून ही स्पर्धा डबल जोडी प्रकारात होणार आहे.

स्पर्धेचे नियम व अटी
या स्पर्धा आंतरराष्ट्रीय नियमांनुसार खेळवली जाणार असून एकूण आठ बोर्डावर सामने होणार आहेत. अंतिम निर्णय पंच व समितीकडे राहील. स्पर्धा वेळेत सुरू होणार असून उशीर झाल्यास संबंधित जोडी बाद ठरवली जाईल. प्रवेश फी भरून जोडीचे नाव दोन दिवस आधी ऑनलाईन नोंदवणे आवश्यक आहे. मद्यप्राशन केलेल्या स्पर्धकांना प्रवेश दिला जाणार नाही. राहण्याची सोय आयोजकांकडून उपलब्ध करून दिली जाईल.

या स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्याचे आयोजन मंगळवार, दि. २६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता करण्यात आले असून सिने दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या हस्ते होणार आहे. या स्पर्धेसाठी जास्तीत जास्त कॅरम खेळाडूंनी सहभाग घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.



