महात्मा फुले समाजसेवा संस्थेमार्फत दिपावली निमित्त विधवा महिलांना साड्या व शिधा वाटप

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – आज (दि. १२) रोजी दीपावली सणानिमित्त करमाळा येथील महात्मा फुले समाज सेवा मंडळ संस्थेमार्फत पोथरे व करमाळ्यातील ४५ विधवा महिलांना साड्या व शिधा वाटप करण्यात आले.

ज्या महिला काही कारणास्तव उपस्थित राहू शकल्या नाही अशा महिलांंना साड्या व साहित्य घरपोच करण्यात आले. महिलांंना लाभ मिळाला. या साठी श्रीमती सुहासिनी बिवलकर, पुणे यांनी सहकार्य केले.

यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद झिंजाडे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, महाराष्ट्र व गोवा सरकार कायदा करण्याबाबत अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित करून चर्चा झाली आहे. मात्र सध्याची राजकीय परिस्थितीत हा विषय दुर्लक्षित झालेला आहे. शासनाने डिसेंबर महिन्यातील अधिवेशनात चर्चा करून लवकरात लवकर कायदा करावा अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच विधवा प्रथा निर्मूलन अभियानच्या हेरवाड पॅटर्न संदर्भात माहिती दिली.

पोथरे येथील ग्रामसभेत हेरवाड पॅटर्न राबविल्याचा परिणाम म्हणून या कार्यक्रमात उपस्थितीत विधवा महिलांपैकी पंधरा महिलांं ह्या गंध लावून आल्या होत्या. या कार्यक्रमात जयद्रथ झिंजाडे,सदाशिव पांडव,प्रवीण पाटील अनंतराव जाधव, मनोहर ढवळे व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!