विघ्नहर्ता संस्थेतर्फे केम येथील ४५० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व व्याख्यान सत्र आयोजित

केम(संजय जाधव)- केम (ता. करमाळा) येथील विघ्नहर्ता बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने अध्यक्ष सागर राजे तळेकर यांनी इयत्ता १० वी ते १२वीमधील एकूण ४५० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांसाठी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. व्याख्याते देवा चव्हाण (बार्शी) व डॉ. महेश निकत, (करमाळा) यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.


या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी सुदर्शन तळेकर होते. कार्यक्रमासाठी राजाभाऊ तळेकर, शारदा गोविंदराव पवार, नूतन माध्यमिक शाळा व श्री उत्तरेश्वर हायस्कूल येथील विद्यार्थी उपस्थित होते. या वेळी महेश तळेकर, वसंत तळेकर, प्राचार्य माधव बिले, प्राचार्य ताकमोगे, विजय माने, प्रशासन अधिकारी विष्णू काळे, प्राध्यापक डॉ. मच्छिंद्र नांगरे, भारत गायकवाड तसेच चारही माध्यमिक शाळांचे शिक्षक उपस्थित होते.



