संजयमामा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त केममधील आश्रमशाळेत शालेय साहित्य वाटप

केम (संजय जाधव):माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कंदर येथील पदम पंडित प्रतिष्ठानच्या वतीने केम येथील प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेतील गरजू विद्यार्थ्यांना स्कूल बॅग आणि पाणी बाटल्यांचे वाटप करण्यात आले. हा आगळा-वेगळा उपक्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष अण्णासाहेब पवार यांच्या पुढाकाराने राबविण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मारुती पारखे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य विलास राऊत उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अण्णासाहेब पवार यांनी केले.

या वेळी मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुणे विलास राऊत म्हणाले, “संजय मामा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू विद्यार्थ्यांना बॅग आणि पाण्याच्या बाटल्या वाटप करून खऱ्या अर्थाने समाजाप्रती आपुलकी दाखवली आहे. या विद्यार्थ्यांनी गरीबीवर मात करून डॉक्टर, वकील, इंजिनिअर, कलेक्टर आणि उद्योजक बनण्याचे स्वप्न पाहावे. जिद्द आणि आत्मविश्वासाने यश नक्कीच मिळवता येते.”


कार्यक्रमास मंडळ अधिकारी मीरा नागटिळक, गोरख पारखे, उपसरपंच सागर कुडे, संदिप तळेकर, गणेश तळेकर, वैजनाथ गुरव, कांतीलाल पवार, चेअरमन सुदर्शन तळेकर, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
सूत्रसंचालन वाघमोडे सर यांनी तर आभार प्रदर्शन काकासाहेब तळेकर यांनी केले.



