गौंडरे येथे सोनाली खंडागळे यांचेकडुन संक्रांतीच्या सणानिमित्त महिलांना शेवगा व करंजाच्या बियांचे वाटप..

करमाळा / संदेश प्रतिनिधी : गौंडरे (ता.करमाळा) येथील निसर्गप्रेमी संगीत विशारद विजय खंडागळे यांच्या पत्नी सोनाली खंडागळे यांनी संक्रातीच्या निमित्ताने १०० देशी शेवग्याच्या बिया व १०० करंजाच्या बियाचे गौंडरे गावातील महिलांना वाटप करून समाजात एक नवा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.
विजय खंडागळे यांनी आपल्या गौंडरे गावात विविध उपक्रम राबविले आहेत, त्यांनी त्यांच्या मुलाच्या वाढदिवस पर्यावरणपूरक प्रेरणादायी असा साजरा केला होता, त्यांनी मुलाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने केमीकल युक्त केक न वापरता पेढा, बर्फी वाटून तसेच १०० देशी अंब्याची रोपे वाटून, जि.प प्राथ शाळा हेडगेवार विद्यालय, धर्मवीर संभाजी विद्यालय व चारही अंगणवाडी मध्ये वड, पिंपळ, करंज अशा विविध वृक्षांचे वृक्षारोपण व वृक्षभेट देवून साजरा केला. तसेच आलेल्या सर्वांना भेट वस्तु म्हणून १०० देशी अंब्यांची रोपेभेट दिली.
या वर्षीसंक्रांतीच्या सणानिमित्त आपण काहीतरी वेगळे करावे या हेतूने सोनाली खंडागळे यांनी महिलांना संक्रातीच्या निमित्ताने १०० देशी शेवग्याच्या बिया व १०० करंजाच्या बियाचे गौंडरे गावातील महिलांना वाटप करून समाजात एक नवा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.





