प्रेरणा मानव विकास प्रतिष्ठानच्या वतीने गरजूंना फराळ वाटप

करमाळा (प्रतिनिधी) – रावगाव (ता. करमाळा) येथील प्रेरणा मानव विकास प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या वतीने करमाळा शहरातील गरजू, अनाथ आणि गरीब नागरिकांना दिवाळीनिमित्त फराळ व मिठाईचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमावेळी संस्थेचे अध्यक्ष रामदास कांबळे म्हणाले, “प्रेरणा मानव विकास प्रतिष्ठान वर्षभर समाजातील गरीब, अनाथ आणि वंचित घटकांसाठी कार्यरत आहे. दिवाळी हा आनंदाचा सण सर्वांसाठी समृद्धीचा असावा, यासाठीच आम्ही समाजातील वंचितांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्याचा छोटासा प्रयत्न करतो.”
कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष गणेश कांबळे, उपजिल्हा रुग्णालयाचे ओएसडी कपिल भालेराव, श्री.विभूते यांसह विविध मान्यवर उपस्थित होते.





