जेऊर येथे भगवान महावीर जयंती उत्साहात साजरी – संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेडने केले पालखीचे स्वागत

केम (संजय जाधव) : करमाळा तालुक्यातील जेऊर येथे भगवान महावीर जयंती मोठ्या ऊत्साहात साजरी करण्यात आली. यानिमीत्त पालखी मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी जेऊर येथील संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेड यांच्या वतीने सदर पालखी मिरवणूकीत पुष्पहार अर्पण करून पालखी मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले. यावेळी संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने शीतपेय व पाणी बॉटल वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना आदिनाथ माने म्हणाले, भगवान महावीर यांच्या अहिंसा आणि अपरीग्रह या दोन महान मानवी मूल्यांवर सकल जैन धर्माचे विचार मानव जातीला दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक आहेत.
यावेळी उपस्थित जिजाऊ ब्रिगेडच्या महिला मीनाक्षी पाटील सुवर्णा घाडगे राणी पाटिल प्रियंका खटके तसेच संभाजी ब्रिगेडचे पुणे विभागीय अध्यक्ष नितीन खटके दादासाहेब थोरात निलेश पाटिल अतुल निर्मळ धन्यकुमार गारुडी पांडुरंग घाडगे आदिनाथ माने बाळासाहेब तोरमल सोमनाथ जाधव अजित उपादे इत्यादी उपस्थित होते.


