'एक हात मदतीचा' संकल्पनेतून जगताप विद्यालयात गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप -

‘एक हात मदतीचा’ संकल्पनेतून जगताप विद्यालयात गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप

0

करमाळा (दि. १६ जुलै) – ‘एक हात मदतीचा’ या समाजाभिमुख संकल्पनेतून कर्मवीर अण्णासाहेब जगताप विद्यालयात गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले. विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षिकांनी एकत्रितपणे आर्थिक मदत उभारून हा उपक्रम राबवला.

या उपक्रमांतर्गत करमाळा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी मिनीनाथ टाकले आणि श्री. कदम यांच्या हस्ते एकूण ५० गरजू विद्यार्थ्यांना गणवेशांचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाला विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक श्री. कवडे, सेवानिवृत्त शिक्षक श्री. खान व श्री. किर्वे यांचीही उपस्थिती लाभली.

यावेळी टकले यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले व या उपक्रमाचे विशेष कौतुक करत, शिक्षकांच्या सामाजिक जाणिवेचे भरभरून अभिनंदन केले. कवडे आणि किर्वे यांनीही आपल्या मनोगतातून विद्यालयाच्या या उपक्रमाचे कौतुक करत अशा उपक्रमांची आवश्यकता व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या शेवटी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील जाधव यांनी आपल्या मनोगतातून, “हा उपक्रम भविष्यातही नियमितपणे राबवला जाईल,” असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगदाळे यांनी केले तर आभार प्रदर्शन धनवे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!