५ हजार महिलांना शिवसेनेच्या वतीने वडापावचे वाटप

करमाळा (दि.१७) – शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण भागातून करमाळा शहरात गणेशोत्सव पाहण्यासाठी आलेल्या पाच हजार महिलांना अल्पोहार म्हणून वडापाव वाटप करण्यात आले.
या स्टॉलचे उद्घाटन वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद घुगे, विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे व यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद फंड यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ‘काय सांगता’चे संपादक अशोक मुरूमकर,संघर्ष न्यूज चे संपादक सिद्धार्थ वाघमारे,तेज वार्ताचे संपादक विशाल परदेशी,कमलाई नगरीचे संपादक जयंत दळवी,दैनिक लोकमतचे पत्रकार नासिर कबीर,कमलाई वार्ताचे संपादक सचिन जवेरी,पवनपुत्र चे संपादक दिनेश मडके,पर्यवेक्षक समितीचे सदस्य बाळासाहेब राख, सूर ताल संगीत विद्यालयाचे प्रा.बाळासाहेब नरारे प्रा.शीलवंत आदी मान्यवर उपस्थित होते.

गणपतीच्या दर्शनासाठी करमाळा शहरात आलेल्या महिलांना यावेळी अल्पहार देण्यात आला. या ठिकाणी लेक लाडकी योजना, लाडकी बहीण योजना, वयश्री योजना शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष,बांधकाम कामगार निधी मुद्रा लोन, अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ मार्फत मिळणारे कर्ज योजनांची माहिती देण्यात आली. महिलांना स्वतःच्या पायावर उभा राहून लघुउद्योग सुरू करावे यासाठी शासनाने सुरू केलेल्या विविध योजनांची माहितीपत्रके देण्यात आली.

या कार्यक्रमांसाठी तालुका उपाध्यक्ष डॉक्टर गौतम रोडे,ओबीसी आघाडीचे शहर प्रमुख अंकुशराव जाधव,शिवसेना शहरप्रमुख संजय शीलवंत, बांधकाम कामगार आघाडी प्रमुख बंडू काळे,अनुसूचित जाती जमाती मंडळाचे सदस्य माने,रंभापुरा शाखाप्रमुख निलेश चव्हाण वैद्यकीय कक्ष प्रमुख नागेश शेंडगे बापूराव दास, खांबेवाडी शाखाप्रमुख बाबासाहेब तोरणे आदींनी परिश्रम घेतले.
करमाळा शहरातील प्रत्येक घराघरात जाऊन आम्ही लाडकी बहीण योजना व लेक लाडकी व श्री योजनेची माहिती देत असून आज प्रत्येक महिलांना मोफत अल्पहार देऊन या सर्व योजनांची माहिती दिली.
- कीर्ती स्वामी,शहरप्रमुख शिवसेना महिला आघाडी




