म्हैसगावच्या पूरग्रस्त नागरिकांना जिल्हाधिकारी आशिर्वाद यांनी भेट देऊन केली विचारपूस

केम(संजय जाधव): सीना नदीच्या महापुरामुळे माढा तालुक्यातील अनेक गावांना फटका बसलेला आहे. अनेक गावातील घरामध्ये पाणी शिरले असल्याने त्यांना विविध सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले होते. म्हैसगाव येथील पूरग्रस्त नागरिकांना चिंचगाव येथील महादेव टेकडीवरील शेल्टर हाऊस मध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. या शेल्टर हाऊस मध्ये सध्या ३९ कुटुंबातील एकूण १०५ नागरिक राहत आहेत.

या शेल्टर हाऊसला जिल्हाधिकारी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम यांनी मंगळवारी भेट देऊन पूरग्रस्तांची विचारपूस केली आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी उपविभागीय अधिकारी आव्हाड, तहसीलदार भोसले, नायब तहसीलदार जाधव, मंडळ अधिकारी चराटे, तलाठी कुलकर्णी, ग्रामसेवक शिरसट तसेच म्हैसगावचे सरपंच पठाण आणि चिंचगावचे सरपंच सुतार उपस्थित होते.





