जिल्हास्तरीय सरपंच चषक टेनीस बाॅल क्रिकेट स्पर्धा 9 जानेवारीपासून

करमाळा (ता.२९): जिल्हास्तरीय सरपंच चषक-2025 टेनीस बाॅल हाफ पीच क्रिकेट स्पर्धा 9 जानेवारीपासून जेऊर येथील बाजार समितीतील एन.सी.सी. ग्राऊंडवर होणार आहेत. या स्पर्धेचे उद् घाटन जेऊरचे सरपंच पृथ्वीराज पाटील यांचे हस्ते सकाळी 10 वाजता होणार आहे.

या स्पर्धेसाठी प्रथम बक्षीस 31 हजार रुपयांचे असून ते बक्षीस सरपंच पाटील यांचे आहे.दुसरे बक्षीस 21000 चे – शेगावचे सरपंच अमर ठोंबरे व सोनु होनमाने, तितृय बक्षीस 11000 चे – जेऊर चे उपसरपंच नागेश झांजुर्णे व सदस्य संदिप कोठारी यांचे तर चौथे बक्षीस 7000 रु चे- गणेश फुके यांचे आहे.
या स्पर्धेसाठी 1700 रुपये प्रवेश फी ठेवण्यात आली आहे.
यास्पर्ध्येसाठी नोंदणी करणार्या पहिल्या 32 संघांना प्रवेश देण्यात येणार आहे. 6 षटकांचा सामना होणार आहे.
स्पर्धा उद् घाटनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी सभापती अतुल पाटील हे उपस्थित राहणार आहेत.
स्पर्धकांनी चेतन होळकर-9373425887,अजिंक्य अडसुळ-7498855468, अजय कांबळे 9561656572, सचिन होळकर-9960708088,उमेश मारकड-7517368796 तसेच सुजित माने-9657548964 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.





