गुणवत्ता शोध चाचणी मध्ये जि. प. पाडळी शाळेचे सुयश

करमाळा (दि.१६ ) – जिल्हा परिषद सोलापूर वपंचायत समिती शिक्षण विभाग करमाळा यांच्या संयुक्त विद्यमानाने तालुकास्तरीय विद्यार्थी गुणवत्ता शोध चाचणी २०२४/०२५ स्पर्धेचे आयोजन केले होते.या स्पर्धेत पाडळी शाळेतील मुलांची पोथरे केंद्रात निवड होवून तालुकास्तरीय लोकनृत्य स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता.

त्यामध्ये मोठ्या गटामध्ये तालुक्यात तृतीय क्रमांक आला त्याबद्दल तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री जयवंत नलवडे साहेब यांच्या हस्ते प्रमाण पत्र देवून गौरविण्यात आले
विजयी सर्व विद्यार्थाचे गटशिक्षणाधिकारी श्री जयवंत नलवडे विस्ताराधिकारी श्री मिनीनाथ टकले नितिन कदम केंद्रप्रमुख निशांत खारगे शाळाव्यवस्थापन समिती अध्यक्ष सर्व सदस्य सरपंच उपसरपंच विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन पाडळी गावातील ग्रामस्थ मुख्याध्यापक यांनी विद्यार्थी व सर्व मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.




