कमला देवी मंदिर – जतन व संवर्धन कामास घाडगे यांच्याकडून १ लाख ११ हजार रुपयेची देणगी

करमाळा (संदेश प्रतिनिधी) -श्री कमला देवी मंदिर जतन व संवर्धन कामास गेल्या तीन महिन्यांपासून कामास सुरुवात करण्यात आली आहे. मंदिर जतन संवर्धनाचे काम प्रगतीपथावर असून ट्रस्ट चे अध्यक्ष सोमनाथ चिवटे यांनी मदतीचे आवाहन भक्तांकडे केले होते. या आव्हानास प्रतिसाद म्हणून आज (दि.१४) मूळचे करमाळ्याचे व सध्या व्यवसायानिमित्त पुणे (भोसरी) मध्ये कार्यरत असलेले सचिन चंद्रकांत घाडगे यांनी रूपये ११११११/ (एक लाख आकरा हजार एकशे अकरा ) धनादेश द्वारे (चेक) श्रीकमला देवी मंदिर जतन व संवर्धन कामास देणगी दिली. यानिमित्त त्यांचा सत्कार मंदिर समितीच्या वतीने करण्यात आला.

यावेळी मंदिर समितीचे अध्यक्ष सोमनाथ चिवटे, सचिव अनिल पाटील, विश्वस्त डॉक्टर प्रदीपकुमार जाधव पाटील, विश्वस्त डॉक्टर महेंद्र नगरे, विश्वस्त सुशील राठोड विश्वस्त राजेंद्र वाशिंबेकर ,विश्वस्त ॲड. शिरीषकुमार लोणकर प्रशासनाधिकारी महादेव भोसले व्यवस्थापक अशोक गाठे,मंदिर पुजारी,रोहित पुजारी, सचिन सोरटे, धनंजय सोरटे उपस्थित होते.


या निमित्ताने श्रीकमलाभवानी मंदीर जीर्णोद्धार कामासाठी भाविकांनी सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन देखील ट्रस्ट च्या माध्यमातून करण्यात आले.श्री कमलादेवी मंदिर समिती स देणगी दारांना८०जी कलमान्वये आय कर मधून सवलत मिळत आहे . तसेच ऑनलाइन देणगीची सुविधा उपलब्ध आहे. यासाठी अशोक गाठे मो. नंबर ९४०४७०८९२४ यांना संपर्क करण्याचे आवाहन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!