थोर महापुरुषांची जातीमध्ये वाटणी करू नका- सुजित बागल
करमाळा (संदेश प्रतिनिधी) – छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ,महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज यासारखे अनेक महापुरुषांनी जातीभेद न पाळता निस्वार्थीपणे अठरापगड जाती, बहुजन यांना सोबत घेऊन प्रत्येकाला समान वागणूक देत समाजहिताची कामे केली आहेत. तसेच महाराष्ट्रासह देशात जातीव्यवस्था जपण्याचे काम केले, त्यामुळे महापुरुषांची जाती धर्मा मध्ये वाटणी न करता प्रत्येक समाजाने मिळून या महापुरुषांच्या जयंती मध्ये सहभागी झाले पाहिजे. ही काळाची गरज असून सामाजिक बांधिलकी जपणे हे आजच्या नवीन पिढीचे काम आहे असे वक्तव्य मांगी ग्रामपंचायत सदस्य सुजित बागल यांनी व्यक्त केले.
एक ऑगस्ट रोजी मांगी येथे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची १०३ वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच समाज बांधव उपस्थित होते. पूढे बोलताना ते म्हणाले की, गेली अनेक वर्षापासून पंचशील बुद्ध विहार कमिटीतील सर्व सदस्य सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य करत असून या बुद्ध विहारांमध्ये सर्व महापुरुषांचे प्रतिमा असून पंचशील बुद्ध विहार कमिटीतर्फे प्रत्येक महापुरुषाची जयंती साजरी करण्यात येत. यातून समाजामध्ये एक चांगला संदेश दिला जातो पंचशील बुद्ध विहार कमिटीचे कार्य इतरांनी आदर्श घेण्यासारखे आहे
यावेळी मांगी येथील सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील अष्टपैलू व्यक्तिमत्व श्री शशिकांत अवचर सर यांचा वाढदिवसानिमित्त मानाचा फेटा बांधून त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी सुजित तात्या बागल, शशिकांत अवचर सर, पत्रकार प्रवीण अवचर, मांगी येथील पोलीस पाटील आकाश शिंदे. मातंग एकता आंदोलनाचे रवींद्र शिंदे .रेवनाथ शिंदे .नितीन शिंदे .ऋषिकेश शिंदे. महादेव लोंढे अमित शिंदे सागर शिंदे ,तुषार शिंदे रोहित शिंदे, शुभम शिंदे, करण शिंदे ,संदेश शिंदे अमोल शिंदे ,रामभाऊ शिंदे अर्जुन शिंदे, करण शिंदे, तसेच पंचशील बुद्ध विहार कमिटीचे सदस्य प्रेम चव्हाण. अजय अवचर .शहाजी अवचर. अभिषेक अवचर. शुभम अवचर. यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
त्याचप्रमाणे मांगी येथील लहुजी वस्ताद तालीम संघ व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती उत्सव कमिटी तर्फे 11 ऑगस्ट रोजी साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. तसेच मांगी येथील दिग्विजय बागल वाचनालया तर्फे “फकीरा” या कादंबरीचे वाचन करण्यात येणार असून जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सजित तात्या बागल यांनी केले आहे. कार्यक्रमाची प्रस्तावना व आभार प्रदर्शन प्रवीण अवचर यांनी केले