विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नका : चंद्रकांतकाका सरडे - Saptahik Sandesh

विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नका : चंद्रकांतकाका सरडे


करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : 2019 ते 24 या पंचवार्षिक मध्ये आमदार संजयमामा शिंदे यांनी केलेल्या विकास कामामुळे विरोधक भांबावून गेलेले आहेत. विधानसभेची निवडणूक विकास कामांचा मुद्दा सोडून भरकटवली जात आहे. आ.शिंदे यांनी दिलेल्या 3490 कोटीच्या विकास कामांची चेष्टा उडवणे व अतिशय खालच्या पातळीवर जाऊन टीका करणे हे गलिच्छ राजकारण विरोधकांनी सुरू केले असून आ.संजयमामा शिंदे गटाचे प्रमुख कार्यकर्ते गट सोडणार आहेत अशा वावड्या उठवून मतदारांमध्ये संभ्रम पसरवण्याचे काम विरोधकांनी सुरू केले असून विरोधकांच्या भूलथापांना अजिबात बळी पडू नका. मला कापले तरी मी संजयमामांचा गट सोडणार नाही असे रोखठोक प्रतिपादन कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा चिखलठाण चे माजी सरपंच चंद्रकांत काका सरडे यांनी केले.


याविषयी अधिक बोलताना ते म्हणाले की ,जेऊर – चिखलठाण -कुगांव या 16 किलोमीटरच्या रस्त्यासाठी 16 कोटी रुपये मंजूर करून एक महिन्यात रस्ता पूर्ण केल्यामुळे तसेच कुगांव ते शिरसोडी या नदीवरच्या पुलासाठी 395 कोटी निधी मंजूर करून सदर कामाचे भूमिपूजन करून काम चालू झालेले आहे . त्यामुळे आमच्या भागातील शेतकरीवर्ग मामांच्या कार्यपद्धतीवर खुश आहे .करमाळा तालुका सुजलाम सुफलाम करण्यासाठी आमदार संजयमामा शिंदे यांच्या नेतृत्वाची खऱ्या अर्थाने तालुक्याला गरज आहे . माझ्याविषयी मतदारसंघात उलट सुलट चर्चा सुरू होती , परंतु मला कापले तरी मी आमदार शिंदे यांचा गट सोडून कुठेही जाणार नाही . मामांना परत एकदा निवडून आणण्यासाठी जिवाचं रान करून चिखलठाण परिसरातून मोठं मताधिक्य मिळवून देणार असुन तालुक्यातील मतदारांनी सुध्दा आपले मत वाया न जाऊ देता सफरचंदाच्या चिन्हावर मतदान करावे असे आवाहन त्यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!