कोशिश करनेवाले की हार कभी नही होती – डॉ.अॅड.बाबूराव हिरडे
करमाळा (प्रविण अवचर यांजकडून) : विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील १६ ते २१ वर्षे वय, ही पाच वर्षे खूप महत्त्वाची असतात. आपल्या आयुष्यात चांगले करिअर घडविण्यासाठी या पाच वर्षात विद्यार्थ्यांनी मनापासून अभ्यासाची मेहनत घेत यश मिळविण्यासाठी सतत प्रयत्नशील राहायला हवे. असेच विद्यार्थी यशाचे शिखर गाठतात व आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करतात. कोशिश करनेवाले की हार कभी नही होती, असे मत करमाळा येथील ज्येष्ठ विधिज्ञ व पत्रकार डॉ.अॅड.बाबूराव हिरडे यांनी मांगी येथे व्यक्त केले.
मांगी येथील दिग्विजय वाचनालयातर्फे गुणवंतांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. यावेळी करमाळा तालुक्यातून राज्यसेवा परीक्षा अंतर्गत क्लासवन राजपत्रित अधिकारी पदी निवड झालेले रत्नदीप जगदाळे (हिवरे), रोहिदास शिंदे(मांगी), अक्षय शिंदे (वडगाव), श्री निलेश भोसले (कुंभेज), ईश्वर नरसाळे (पुनवर), अमर ननवरे (पुनवर) यांचा मान्यवरांच्या हस्ते, पुस्तक शाल ,श्रीफळ ,फेटा बांधून सत्कार करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामसुधार समितीचे ह.भ.प. डॉ .बाबुराव हिरडे होते, बाबासाहेब जगदाळे, केंद्र प्रमुख संतोष पोतदार, सुहास कांबळे ,महेंद्र अवचर ,प्रकाश बागल ,सुजित बागल, ग्रामसेवक सरडे भाऊसाहेब, अदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
पुढे बोलताना अॅड.हिरडे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी मोबाईलचा अनावश्यक वापर कमी करायला हवा. काबाडकष्ट करून शिकवणाऱ्या आई-वडिलांचा मुलगा जेव्हा क्लास वन अधिकारी होतो तेव्हा त्या आई-वडिलांचा आनंद हा जगातल्या सगळ्या आनंदापेक्षा मोठा असतो.यावेळी अॅड.हिरडे यांनी दिग्विजय बागल वाचनालयाच्या उपक्रमाचे कौतुक करत उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी मांगी येथील दिग्विजय बागल वाचनालयातर्फे मांगी प्राथमिक शाळेतील इयत्ता पहिली ते चौथी मधील विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गणवेश वाटप करण्यात आले.
यावेळी मांगीतील ग्रामस्थ प्रताप बागल शशिकांत अवचर,रवींद्र शिंदे,सुहास कांबळे गुरूजी, संपत बागल ,अनिल बागल पुरुषोत्तम नरसाळे ,गुलाब क्षीरसागर ,गणेश नरसाळे, सुधाकर नरसाळे, चंद्रकांत राऊत ,रामनाना बागल, प्रकाश ननवरे ,राहुल जाधव, आबा देशमाने ,नितीन शिंदे अभिमान अवचर, ग्रामपंचायत सदस्य स्नेहल अवचर, पोलीस पाटील आकाश शिंदे, शिपाई संजय सोनवणे, ,शहाजी अवचर, सुरेश साठे ,पत्रकार प्रवीण अवचर , प्रेम चव्हाण ,रोहित शिंदे, व विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते. कार्यक्रमाची प्रस्तावना ग्रा.सदस्य सुजित तात्या बागल यांनी केली तर आभार प्रदर्शन ग्रंथपाल बाळासाहेब यांनी केले.