डॉ.अनुश्री कोग्रेकर यांची वाराणसी येथील टाटा मेमोरियल कॅन्सर सेंटर मध्ये फेलोशिपसाठी निवड

करमाळा(दि.३): डॉ.अनुश्री संजय कोग्रेकर यांची वाराणसी येथील टाटा मेमोरियल सेंटर मुंबईचा भाग असलेल्या पंडित मदन मोहन मालवीय कॅन्सर सेंटर या ठिकाणी फेलोशिपसाठी निवड झाली आहे.
अनुश्री यांचे दहावीपर्यंत शिक्षण करमाळा येथील महात्मा गांधी विद्यालयात झाले. अकरावी-बारावी लातूर येथील दयानंद कॉलेजला झाले. त्यानंतर त्यांनी एमबीबीएस (MBBS) पदवीचे शिक्षण कोल्हापूर येथे येथील डी वाय पाटील मेडिकल कॉलेजमध्ये उत्कृष्ट गुण मिळवून पूर्ण केले. त्यानंतर पदव्युत्तर शिक्षण MS in Obstetrics And Gynaecology या विषयात तळेगाव दाभाडे (पुणे) येथील मायमर मेडिकल कॉलेजला पुर्ण केले.
यानंतर आता त्यांची Gynaecology विषयातील फेलोशिपसाठी वाराणसी येथील टाटा मेमोरियल सेंटरच्या पंडित मदन मोहन मालवीय कॅन्सर केंद्रामध्ये निवड झाली आहे. ही फेलोशिप एक वर्षांची असून या ठिकाणी त्या महिलांच्या कॅन्सरवरील आजारासंदर्भातील उपचाराचे शिक्षण त्या घेणार आहेत.
करमाळा येथील कोग्रेकर हॉस्पिटल व सांगली येथील उषःकाल अभिनव इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे वैद्यकीय संचालक डॉ.संजय कोग्रेकर यांच्या त्या कन्या आहेत. अनुश्री यांच्या फेलोशिपच्या निवडीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पंडित मदन मोहन मालवीय कॅन्सर सेंटर (MPMMCC) हे उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे असून टाटा मेमोरियल सेंटर मुंबई आणि बनारस हिंदू विद्यापीठ (BHU) यांचा हा संयुक्त उपक्रम आहे. नॅशनल कॅन्सर ग्रिड (NCG) अंतर्गत स्थापन होणारे हे भारतातील पहिले कॅन्सर सेंटर असून कॅन्सरवर उपचार करणारे हे मोठे हॉस्पिटल आहे.





