डॉ.भावना पांडव-वाघ एमडी परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण..

करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : करमाळा तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे माजी चेअरमन व चिखलठाण केंद्राचे माजी केंद्रप्रमुख भारत पांडव यांची सुकन्या डॉ.भावना भारत पांडव-वाघ ही काशीबाई नवले मेडिकल कॉलेज कात्रज पुणे येथून एमडी (मानसोपचार तज्ञ) ही परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या आहेत.
डॉ.भावना यांचे एमबीबीएसचे शिक्षण बी. जे. वैद्यकिय महाविद्यालय, पुणे येथून झाले आहे. तिचे बंधू डॉ. भूषण पांडव यांनी सरस्वती धन्वंतरी डेंटल कॉलेज परभणी येथून बीडीएस शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांच्या या यशामागे मामा व माजी पंचायत समिती सदस्य मारूती सोनवणे, आई-वडील व पती डॉ. सचिन वाघ तसेच आयोडीन पद्मश्री डॉ. चंद्रकांत पांडव यांचे मार्गदर्शन लाभल्याचे सांगितले.
एमडी परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल केमचे माजी सरपंच अजित तळेकर, कविटगावचे माजी सरपंच विठ्ठल चौधरी, पंचायत समितीचे माजी सभापती अतुल पाटील, माजी उपसभापती दत्ता सरडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आण्णासाहेब कांबळे, माजी आमदार नारायण पाटील व आयोडीन मॅन पद्मश्री डॉ. चंद्रकांत पांडव यांनी डॉ. भावना पांडव यांचे अभिनंदन केले.





