डाॅ.धनंजय कदम सहआयुक्त पदी पदोन्नती -

डाॅ.धनंजय कदम सहआयुक्त पदी पदोन्नती

0

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – जेऊर (ता करमाळा) येथील सन 2014 च्या बॅचचे आयआरएस(IRS)अधिकारी डॉ धनंजय बंकटराव कदम यांना सह आयुक्त पदी पदोन्नती मिळाली आहे.

सन 2014 मध्ये त्यांची केंद्रीय लोकसेवा आयोगातुन 381व्या क्रमांकाने निवड झाली होती. त्यानंतर रत्नागिरी व कोल्हापूर या ठिकाणी अनुक्रमे सहायक आयुक्त व उपायुक्त पदी त्यांची पोस्टिंग झाली होती.सन 2020-21 या वर्षी त्यांना पुणे विभागात विशेष कार्य केल्याबद्दल उत्कृष्ट कार्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सन 2021 पासून ते पुणे येथे सीमाशुल्क उपायुक्त पदी कार्यरत होते. नोव्हेंबर 2023 ला त्यांची बदली वस्तू व सेवा कर विभागात होऊन आता त्यांची सह आयुक्त पुणें पदी पदोन्नती झाली आहे . त्यांचं सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!