शेटफळकरांचा आदर्श इतर गावांसाठी अनुकरणीय- डॉ. हिरडे
करमाळा/संदेश प्रतिनिधी
करमाळा,ता.१४: सामाजिक,धार्मिक, कृषी व सांस्कृतिक क्षेत्रात शेटफळ या गावाने जो आदर्श निर्माण केला आहे. तो आदर्श तालुक्यातील अन्य गावासाठी अनुकरणीय आहे, असे मत संत साहित्याचे अभ्यासक डॉ.अॅड. बाबुराव हिरडे यांनी व्यक्त केले.
शेटफळ येथील जिव्हाळा ग्रुपच्या वतीने ज्या युवकांनी वेगवेगळ्या क्षेत्रात यश हासिल केले आहे, त्यांचा सत्कार, किल्ला बांधणी स्पर्धेतील स्पर्धकांचे बक्षीस वितरण व अन्नपूर्णा उपक्रमाचा शुभारंभ असा कार्यक्रमात आयोजित केला होता. त्यावेळी अध्यक्ष स्थानावरून डॉ. हिरडे बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रभारी तहसीलदार विजयकुमार जाधव हे होते.यावेळी व्यासपीठावर ह. भ. प. विठ्ठल महाराज पाटील, आदर्श शेतकरी कैलास अण्णा लबडे ,श्रीराम गुंड आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ. हिरडे म्हणाले की , शेटफळ येथील जिव्हाळा ग्रुप च्या वतीने प्रतिवर्षी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. या कार्यक्रमांमध्ये ज्या कर्तुत्वान व्यक्तीने वेगळे कार्य केले आहे, त्यांचा सत्कार याचबरोबर गेल्या सात-आठ वर्षापासून किल्ला बांधणे हा असा एक नवा उपक्रम आखून त्यामध्ये छोट्या पासून प्रौढांपर्यंत, मुलापासून मुलीपर्यंत सर्वांचा सहभाग नोंदवून एक आगळ्यावेगळ्या उपक्रम राबवला जात आहे. याबरोबर शेतकरी गटापासून ते लोकविकास फार्मर्स प्रोडूसर कंपनीपर्यंत,, सामाजिक, धार्मिक व सांप्रदायिक कार्यक्रमांमध्ये या गावाचे मोठे योगदान आहे. ते योगदान इतरांच्या दृष्टीने प्रेरणादायी आहे. एका गावामध्ये व्यसनमुक्तीचे काम, एका गावामध्ये ग्राहक पंचायतचे काम, एका गावामध्ये सामाजिक क्षेत्रातील काम आणि एका गावामध्ये सांप्रदायिक क्षेत्रातील काम याचबरोबर सर्वसामान्यांना बरोबर घेऊन जी वाटचाल केली जात आहे आणि त्यांच्या उन्नतीसाठी जे उपक्रम राबवले जातात हे उपक्रम निश्चितच इतरांसाठी आदर्शात्मक आहे आणि हा आदर्श इतरांनी घेण्याची नितांत गरज आहे, असेही मत डॉ. हिरडे यांनी व्यक्त केले.
प्रभारी तहसीलदार विजयकुमार जाधव यांनी या गावाला एक चांगली परंपरा असून या गावातील वाचनालय समृद्ध आहे, ते वाचनालय अधिक समृद्ध होण्यासाठी आपण सर्व प्रकारे सहकार्य करू असे आश्वासन दिले. या गावातील संप्रदायाचे प्रमुख हभप विठ्ठल महाराज पाटील यांनी आपल्या भाषणामध्ये युवकांचे जे कार्य आहे ते निश्चितच प्रकारे आम्हाला सर्वांना आदर्शात्मक अशा पद्धतीचे आहे. या कामातून गावातील युवक हे निश्चितच प्रकारे गावचे तर भूषण आहेतच परंतु तालुक्यात ,राज्यात नव्हे तर देशांमध्ये सुद्धा या गावाचं नाव उज्वल करण्याच्या दृष्टीने निश्चितच प्रयत्न करतील व त्यांनी ते प्रयत्न करावेत असे आवाहन केले.
यावेळी बाल व्याख्याता संध्याराणी लबडे हीचे व्याख्यान झाले तसेच सौ.पुजा लबडे,सौ.दिपाली चिंचकर पोलीस उपनिरीक्षक अमित लबडे यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य. सचिन धेंडे यांनी केले तर आभार पोलीस हवलदार नवनाथ नाईकनवरे यांनी मानले तर सुत्रसंचलन पत्रकार गजेंद्र पोळ यांनी केले. गावातील माजी सरपंच मुरलीधर पोळ तसेच वैभव पोळ साहेबराव पोळ, सुभाषराव लबडे, विजय लबडे ,प्रा.सचिन धेंडे ,सचिन निंबाळकर ,अशोक लबडे, कैलास अण्णा लबडे, श्रीराम गुंड ,विलास आप्पा लबडे संतोष घोगरे महावीर निंबाळकर महेश नाईकनवरे, राजेंद्र साबळे विद्या जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. किल्ले बांधणी स्पर्धेत संग्राम गोरे असद शेख जोया शेख सार्थक सोनटक्के, शंभुराजे घोगरे, ऋतुराज व विराज नाईकनवरे शिवराज व शंभुराज निंबाळकर शिवम रोंगे श्रीयश रोंगे शिवराज चोरगे अमित व सुमित मोरे कन्हैया जाधव वीरेन पोळ या किल्ला स्पर्धेतील स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले
कार्यक्रम नियोजन प्रशांत नाईकनवरे गजेंद्र पोळ, वैभव पोळ, नानासाहेब साळुंखे, विजय लबडे, सागर पोळ विष्णू पोळ आदींनी योग्यरीत्या केले होते.