नियमित चालणे, योग्य आहार यामुळे मधुमेह नियंत्रणात राहतो : डॉ.सुभाष सुराणा
शेटफळ (संदेश प्रतिनिधी) :
शेटफळ : नियमित चालणे, योग्य आहार विहार यामुळे मधुमेह नियंत्रणात राहू शकतो असे प्रतिपादन डॉ. सुभाष सुराणा यांनी शेटफळ (ना) (ता.करमाळा) येथे इंडियन मेडिकल असोसिएशन करमाळा शाखा व जिव्हाळा ग्रुप शेटफळ यांच्यावतीने आयोजित आरोग्य जागृती कार्यक्रमात बोलताना केले.
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या ‘आवो गाव चले’ मोहीमेअंतर्गत शेटफळ (ना) येथे मधुमेह रक्तदाब हृदयविकार व कॅन्सर या आजाराविषयी समाजात जागृती निर्माण व्हावी यासाठी ब्रेक द चेन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होते. पुढे बोलताना डॉ सुराणा यांनी म्हणाले की, आपला देश हा मधुमेह आणि रक्तदाबाचे आगार मानला जात असून, दिवसेंदिवस यामध्ये वाढ होत आहे, अनुवंशिकपणे अनेकांना काही आजाराला सामोरे जावे लागते अनुवंशिकतेची चेन ब्रेक करण्यासाठी मधुमेहाचा त्रास वाढण्यापूर्वीच काही गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे.
यामध्ये दररोज सकाळी चालण्याचे महत्त्व सांगितले. मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी नियमित चालणे महत्त्वाचे असून औषध उपचारांसाठी लाखो रुपये मोजण्यापेक्षा आहार विहार आणि व्यायाम यावर लक्ष केंद्रित केल्यास मधुमेह नियंत्रणात राहतो. यासंबंधी मोठ्या प्रमाणावर जागृतीची गरज असल्याने मेडिकल असोसिएशनच्या वतीने गावोगावी जागृतीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत.
यावेळी बोलताना डॉ.शारदा सुराणा म्हणाल्या की,महिलांनी आपल्या शरीरात कसल्याही प्रकारची गाठ तयार झाली असल्यास तिच्यामध्ये वाढ होत असल्यास ही गोष्ट दुर्लक्षित न करता योग्य उपचार करणे गरजेचे आहे. आरोग्यविषयक त्यांनी महत्त्वाचे उपाययोजना सांगितले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजेंद्र पोळ यांनी केले तर आभार पुजा लबडे यांनी मानले. यावेळी उपस्थित महिलांची मोफत हिमोग्लोबिन तपासणी व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला आदिनाथ चे माजी संचालक सुरेश पोळ, विठ्ठल पाटील महाराज, विलास लबडे, राजाभाऊ रोगे, वैभव पोळ, नानासाहेब साळूंके, अशोक घोगरे, विजय लबडे, प्रल्हाद पोळ, प्रशांत नाईकनवरे, साहेबराव पोळ, अशोक पोळ, पांडुरंग नाईकनवरे कैलास लबडे, जिजामाता महिला शेतकरी गटाच्या अध्यक्षा हर्षाली नाईकनवरे,छाया घोगरे, हिराबाई पोळ वच्छला रोंगे, सुवर्णा लबडे सुषमा पोळ यांच्यासह ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.